EVENT

शिग्गावी आंदोलनात विजापूरचे २ हजार कार्यकर्ते सहभागी होणार

Share

लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी येथील निवासस्थानासमोर धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. अखिल भारतीय लिंगायत पंचमसाली महासभा युवा शाखेचे राष्ट्रीय सरचिटणीस शंकरगौडा बिरादार आणि विजापूर जिल्हा अध्यक्ष बी. एम. पाटील, विजापूर जिल्हा सरचिटणीस निंगनगौडा देवरहिप्परगी यांनी सोलापूर येथे संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी १४ जानेवारीपासून कुडलसंगम लिंगायत पंचमसाली जगद्गुरु पीठाचे पहिले जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली कुडलसंगम ते बेंगळुर पदयात्रा काढून बेंगळुरच्या फ्रीडम पार्कमध्ये भव्य निषेध रॅली, धरणे सत्याग्रह करण्यात आला. अनेकवेळा आंदोलने करून, मुदत देऊनही सरकारने मागणी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे येत्या 19 सप्टेंबर रोजी हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानासमोर मोठा धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या सत्याग्रहात राज्याच्या कानाकोपऱ्यातून व सर्व जिल्ह्यांतून हजारो समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विजापूर जिल्ह्यातून सुमारे 2000 लोक सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला माजी मंत्री के.एस.ईश्‍वरप्पा यांनी पंचमसाळी समाजाला आरक्षण देऊ नये असे नुकतेच म्हटले आहे. कुरुबा समाजाचा एसटी आरक्षणात समावेश व्हावा यासाठी खुद्द ईश्वरप्पा यांनीच लढा दिला होता. पण आता पंचमसालीना आरक्षण देऊ नये असे विधान त्यांनी केले, हे निंदनीय आहे. आमच्या समाजाचे बेळगाव जिल्ह्यातील ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येला ईश्वरप्पाच कारणीभूत आहेत. संतोष पाटील यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते हे संपूर्ण राज्यातील जनतेला माहिती आहे. सुसाईड नोटमध्ये, ईश्वरप्पा यांचे नाव लिहून संतोष पाटील यांनी ईश्वरप्पा यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले होते, मात्र राज्य सरकारने त्यांना क्लीन चिट दिली आहे, हा धोका आहे. आता आमच्या समाजाला आरक्षण मागितले तर त्याला विरोध करणारे ईश्वरपा कोण लागून गेलेत? असा सवाल त्यांनी केला.

Tags: