Crime

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील पैसे मिळविले परत

Share

सायबर फसवणुकीला बळी पडत आर्थिक नुकसानीत आलेल्या तक्रारदारांचे पैसे विजापूर सीईएन पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत.

विजापूर सीईएन पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करून ऑनलाइन फसवणुकीत बळी ठरलेल्या तक्रारदारांचे पैसे वसूल करून ते तक्रारदारांपर्यंत पोहोचविले आहेत.

विजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसपी एच डी आनंद कुमार यांनी हि माहिती दिली आहे. सीईएन पोलीस ठाण्यात यावर्षी एकूण ३१ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून याचा तपास घेण्यासाठी आपल्या आणि एसपी डॉ. राम लक्ष्मणसा अरसिद्दी यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक स्थापन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे डीसीआरबी डीवायएसपी जे एस न्यामगौडर, सीईएन, सीपीआय रमेश आवजी यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने कारवाई करत या प्रकरणी एकूण ३९ लाख ९९ हजार ८५४ रुपये परत मिळविले असून ३१ तक्रारदारांपैकी २४ लाख ४५ हजार ७२९ रुपये बँक खात्याच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. सीईएन पोलीस स्थानकात एकूण २८९६८६५ रुपयांच्या फसवणुकीबद्दल तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी १५३२८६३ रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

ऑनलाईन फसवणूक झालेल्या एक तासात म्हणजेच गोल्डन अवर काळात तक्रार दाखल केल्यास आपली रक्कम परत मिळवता येणे शक्य आहे. यासाठी १९३० या हेल्पलाईन क्रमांकावरदेखील संपर्क साधून आपण तक्रार नोंदवू शकतो.

२०२२ मधील १० प्रकरणांमध्ये रु. ६१५१५६ इतकी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी १० तक्रारदारांच्या बँक खात्यात ४५००३२ परत जमा करण्यात आले. तसेच हेल्पलाइन क्रमांक १९३० वर दाखल झालेल्या एकूण रु. ४८७८३३ रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारींपैकी १० तक्रारदारांना एकूण रु. ४६२८३४ त्यांच्या बँक खात्यात परत जमा झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

या सर्व प्रकरणाचा छडा लावणाऱ्या टीममध्ये सीईएन पीएसआय पी. वाय. अंबिगेर, ए. एन. गुड्डोदगी, कर्मचारी आर. व्ही. नायक, ए. एल. दोडामणी, एम. एम. कुर्विनशेट्टी, पी. एम. पाटील, आर. एम. बुदिहाळ, आर. बी. कोळी, एम. एच. खाणे, सिद्धू दानाप्पगोळ, एस. आय. हेब्बाळट्टी, के. जे. राठोड, ए. एच. पाटील, एस. आर. बडची, एस. एस. केम्पेगौडा, डी. आर. पाटील, व्ही. एस. हुगार यांचा समावेश होता. सीईएन पोलिसांनी केलेल्या या कार्याचे एसपी एच डी आनंद कुमार यांनी कौतुक केले.

यावेळी विजापूर एसपी डॉ. राम लक्ष्मणसा अरसिद्दी यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: