Belagavi

आमदार अभय पाटील यांच्यावर सुजित मुळगुंद यांचा आरोप

Share

आमदार अभय पाटील हे आपल्याला खोट्या केसमध्ये अडकवू पाहत असून आपल्याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

२०२१ मध्ये आमदार अभय पाटील यांच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी लोकायुक्त न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर आमदार अभय पाटील यांनी धमकावल्याचा आरोप करत आपल्याला विनाकारण चुकीच्या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप सुजित मुळगुंद यांनी केलाय.

लाचखोरी प्रकरण मागे घेण्यासाठी रचण्यात आलेले हे षडयंत्र असून याप्रकरणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही आपण पत्र लिहिल्याचे ते म्हणाले. विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी नेहमीच ते खोट्या प्रकरणात गोवण्याची रणनीती वापरतात. याआधी वकील एन.आर.लातूर आणि सामाजिक कार्यकर्त्या मधुमंगला कलंत्री यांच्यासह असंख्य निरपराधांना त्यांनी विनाकारण गोवले आहे. पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मला एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच आपल्याला धमकावण्यात देखील आले असून आपल्याला योग्य संरक्षण मिळावे अशी मागणी करत सुजित मुळगुंद यांनी शहर पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहिले आहे.

बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या या गंभीर आरोपावर आमदार अभय पाटील कशापद्धतीने प्रतिक्रिया देतील हे पाहणे गरजेचे आहे.

Tags: