Belagavi

जुगुळ पीकेपीएस संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Share

कागवाड तालुक्यातील जुगुळ या गावातील पीकेपीएस संघाने १०३ वर्षे पूर्ण केली या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यंदा संघाला ६५ लाख ३४ हजार रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी दिली.

बुधवारी सायंकाळी जुगुळ गावातील मल्लिकार्जुन सभाभवनात वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अभियंते आदिनाथ गणेशवाडी हे होते. यावेळी जुगुळ गावातुन पोलीस विभागात नियुक्ती झालेल्या युवकांचा तसेच वक्फ बोर्डावर संचालक म्हणून नियुक्ती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. यासिन कलावंत, प्रदीप फराळ, परशुराम घटकवी, अनिल पुजारी, जहांगीर कलावंत, अन्वर शिरगुप्पी आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पीकेपीएस संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जुगुळ गावातील पीकेपीएस संस्थेचे सर्व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो असून संघ उत्तम सेवा देत आहे. यंदा 65 लाख 34 हजार 493 टक्के निव्वळ नफा झाला असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापैकी १६ टक्के लाभांश सभासदांना जाहीर करण्यात आला आहे. बिडीसीसी बँकेतून प्रति एकर जमिनीसाठी ३० हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याचप्रमाणे नव्या नियमावलीसंदर्भातही त्यांनी माहिती दिली.

संघाचे कार्यकारी अधिकारी चिदानंद बेडकिहाळ यांनी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यासंदर्भात ठराव वाचून दाखविला. या सभेला माजी एपीएमसी अध्यक्ष अनिल कडोले, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष अनिल सुंके, विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्ष काकसाब पाटील, ज्येष्ठ सदस्य बाबुराव जाधव, भीमगौडा पाटील, सुधाकर गणेशवाडी, संघाचे उपाध्यक्ष बाबागौड पाटील, संचालक शिवगौडा पाटील, तात्यासाहेब वसवाडे, शिवानंद कडोले, इरगौडा पाटील, भालचंद्र अंबी, मालती पाटील, शेवंती शामनेवाडी, रंजन मरसल, मच्छिन्द्र घस्ती, युवराज पाटील, संघाचे व्यवस्थापक चिदानंद बेडकिहाळ, अनिल मिनची, शिवानंद शमनेवाडी आदी उपस्थित होते.

सुकुमार बन्नुरे, आपली मराठी कागवाड

Tags: