Vijayapura

शेतात गवत टाकताना सर्पदंशाने एकाच मृत्यू

Share

शेतात गवत टाकताना साप चावल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बेनकोटगी गावात घडली,
बेनकोटगी गावातील 53 वर्षीय निंगनगौडा बिरादार यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शेतातील गवत कापून नंतर ते गवत शेतात पसरवत असताना त्यांना जहाल विषारी साप चावला. त्यामुळे निंगनगौडा बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: