Belagavi

हिंदी भाषेच्या अधिकृत दर्जाबाबत विरोध

Share

राज्यात हिंदी दिन साजरा केल्याच्या विरोधात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये जेडीएस कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

व्हॉइस : केंद्र सरकारने हिंदी भाषा लादण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाविरोधात बेळगावमध्ये जेडीएसच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. बेळगाव जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या हिंदी लादण्याविरोधातील धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. ()

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना शंकर मूडलगी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशात हिंदी भाषेची सक्ती करण्याचे काम सुरू केले आहे. ब्रम्हराक्षसाची मानसिकता असलेल्या भाजप सरकारचा आपण निषेध करत असून राज्यातील जनतेच्या कष्टाच्या पैशातून हिंदी दिन साजरे केले जात असून या माध्यमातून जनतेची लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्यासाठी कन्नड भाषा हि सार्वभौम असल्याचे ते म्हणाले. ()

यावेळी जेडीएस आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या आंदोलनात जेडीएसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Tags: