बीदर पोटनिवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा सामाजिक विकास महामंडळाची घोषणा केली होती. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याचे उद्घाटन केले आहे. मात्र आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याला याचा लाभ मिळाला नसल्याचे सांगत खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी सभागृहात सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.
बीदर विधानसभा पोटनिवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील मराठा समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मराठा समाज कल्याण निगम स्थापण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल झाल्याने मराठा समाज निगमच्या स्थापना होणार की नाही याबाबत साशंकता होती. त्यामुळे मराठा समाजाच्या धुरिणांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला. त्यानंतर बेंगळूर येथे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका शानदार समारंभात मराठा समाज विकास निगमचे उदघाटन केले होते.
निगमसाठी भरीव निधीचीही घोषणा करून त्याची तरतूदही केली आहे. मात्र अद्याप निगमकडून मराठा विध्यार्थी किंवा लाभार्थ्यांना कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही. या मुद्यावरून खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात नाराजी व्यक्त करून सरकारला धारेवर धरले.


Recent Comments