आज 14 सप्टेंबर, हिंदी दिन देशभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे बेळगावातही प्रत्येक धर्माला समान दर्जा देणाऱ्या, संस्करण प्राधान्य देणाऱ्या संजय घोड़ावत इंटरनेशनल स्कूलमध्ये आज हिंदी दिन विध्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक सॅमसन गोन्साल्विस यांच्या उपस्थितीत हिंदी विभागाच्या शिक्षकांनी पहिली ते नववीपर्यंतच्या विध्यार्थ्यांच्या सहभागाने मनमोहक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विध्यार्थ्यानी हिंदी भाषा आणि तिचे महत्व या विषयावर विचार मांडले.
छोट्या-छोट्या चिमुकल्या विध्यार्थ्यानी हातात फलक घेऊन प्रदर्शन केले. तसेच सुंदर गाणी गाऊन, मनमोहक नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सॅमसन गोन्साल्विस यांनी,
हिंदी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून भारताला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणारी असल्याचे सांगितले. हिंदी दिनानिमित्त आज दिवसभर शाळेत हिंदीत बोलण्याची मुभा देण्यात आली होती.


Recent Comments