Athani

घरी येण्यासाठी हवेत गोळीबार करून पत्नीला धमकी; अथणीत आरोपी पतीला अटक

Share

माहेरातून परतण्यास नकार देणाऱ्या पत्नीला हवेत गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अथणी येथे घडली आहे. या प्रकरणी अथणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथील शिवानंद काळेबाग याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्याची पत्नी प्रीती हिने याबाबत अथणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अथणी येथील प्रीती हिचा ४ वर्षांपूर्वी सिंदगी (जि. विजापूर) येथील शिवानंद याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिने चांगले राहत असलेल्या आरोपीचे नंतर दुसऱ्या महिलेशी संबंध निर्माण झाले. याला कंटाळून प्रीती अथणीतील माहेरच्या घरी येऊन राहिली होती. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगाही आहे. मात्र काल, सोमवारी 12 ऑगस्ट रोजी आरोपी पती शिवानंदने प्रीतीच्या अथणी येथील माहेरच्या घरी येऊन तिला आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला.

त्याला तिने नकार दिला असता शिवानंदने आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर दाखवून आपल्या घरी येण्याची धमकी दिली. तसेच रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन गोळ्या झाडल्या. तू सोबत आली नाहीस तर रिव्हॉल्व्हरमधल्या उरलेल्या गोळ्या तुला घालीन, आणि मीसुद्धा गोळी झाडून घेऊन आत्महत्या करेन अशी धमकी दिली.

यामुळे हैराण झालेल्या प्रीती आणि तिच्या पालकांनी अथणी स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपींचे रिव्हॉल्व्हर विजापूर जिल्ह्याच्या हद्दीतच वापरण्यास परवानगी आहे. पत्नीला गोळ्या घालून धमकी दिल्याने अथणी पोलिसांनी आरोपीला अटक करून रिव्हॉल्व्हर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews