Hukkeri

विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे कर्तव्य : डॉ. मकानदार

Share

विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षक डॉ. एम. जी. मकानदार यांनी व्यक्त केले.

हुक्केरी तालुक्यातील बेळवी येथील सरकारी उच्चप्राथमिक शाळेतून शिक्षकी पेशातून ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते.

२४ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात आपल्याला मिळालेल्या इतर शिक्षक आणि सहकाऱ्यांचे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि एसडीएमसी सदस्यांच्या सहकार्याचे त्यांनी आभार मानले. भविष्यात विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज भासल्यास आपण विनामूल्य मार्गदर्शन करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एम जी मकानदार यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व्ही एस एच कोलकार, सहशिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना बी ए चौगले म्हणाले, एम जी मकानदार सरांनी प्रत्येकाला आपल्यात असलेले कौशल्य शिकविले, मुलांना प्रोत्साहन दिले, उत्तम मार्गदर्शन केले, शाळेचे नाव उंचावण्यासाठी प्रत्येकवेळी मकानदार सरांनी प्रामाणिक प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.()या कार्यक्रमास एसडीएमसी अध्यक्ष संजीव नाईक, एम आय सेंडूरे , एस एन नेरली, महादेव नाईक, माजी विद्यार्थी, सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews