गणेशोत्सवाच्या बंदोबस्तानांतर सुटका झाल्यानंतर बेळगाव जिल्हा पोलिसांनी आता जिल्ह्यात वाहतूक नियमांविषयी जागृती मोहीम हाती घेतली आहे.
होय, वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त बेळगाव जिल्हा पोलिसांनी आता जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक नियमांविषयी जागृती मोहीम सुरु केली आहे. निपाणीतील अशोकनगर एसबीआय बॅंकेजवळ, अथणी शहर, गोकाक शहर व अन्य काही ठिकाणी स्थानिक पोलिसांनी वाहतूक सुरक्षा मोहीम राबवली. यावेळी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती करण्यात आली.
दुचाकीस्वार, रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर आदी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम समजावून देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. वाहतूक नियम पाळून स्वतःचा व दुसऱ्यांचाही जीव वाचवा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून त्यांनाही वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली.


Recent Comments