ट्रॅक्टर, शेती अवजारे यासह इतर कर्जाच्या वसुलीसाठी स्थानिक बँकेच्या शाखेमधून शेतकऱ्यांकडे लावण्यात आलेला तगादा, आणि करण्यात येणारी दडपशाही थांबविण्यात यावी, या मागणीसाठी नेगीलयोगी रयत सेवा संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्या शाखेत आज नेगीलयोगी रयत सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त शेतकऱ्यांसमवेत बँक अधिकाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नेगीलयोगी रयत सेवा संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील म्हणाले, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हेड ऑफिसच्या फेऱ्या मारून झाल्या. येथील स्थानिक बँकेच्या शाखेकडून शेतकऱ्यांवर दडपण आणण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असून शेतकऱ्यांवरील होणार अन्याय थांबविण्यात यावा, या मागणीसाठी आज आपण शेतकऱ्यांसमवेत आलो असल्याचे ते म्हणाले. ()
प्रत्येक तालुक्यात केव्हीजी बँकेत विविध प्रकारे कर्ज भरून घेण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत व्याज माफ करण्यात येते मात्र प्रत्यक्षात ओटीएस घेण्यात येते. ८० टक्के बँक या ग्रामीण भागात आहेत. राष्ट्रीयीकृत बँक ज्यापद्धतीने कर्जमाफी देतात त्यापद्धतीने प्रत्यक्षात कर्ज भरून घेण्यात येत नाही. कर्जवसुलीत ३० टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी एका ८० वर्षाच्या आजोबांनी घेतलेल्या कर्जासंदर्भात बँकेने दिलेल्या वणगुणकीबद्दल देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा ज्या मार्गाने मुख्यमंत्री दौरा करतील त्या मार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी दिला. इकडे तिकडे फिरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे हीत या सरकारला जपता येत नसल्याने सरकारला याबाबत लाज वाटली पाहिजे, हे सरकार भ्रष्टाचारी आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी बसवराज मोकाशी, चन्नाप्पा गणाचारी, प्रसाद कुलकर्णी, बसवंत हारुगोप्प, भाग्यश्री हणबर, इराप्पा मुलीमनी आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments