मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनानंतर त्यांची जागा भरून काढणारा नेता कोण, हा प्रश्न साहजिकच प्रत्येकाच्या मनात आहे. या संदर्भात अनेक नेत्यांची नावे ऐकिवात येत आहेत, परंतु पक्षाच्या व्यासपीठावर यावर कोणतीही चर्चा झालेली नाही असे स्पष्टीकरण राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिले.
बेळगावमध्ये मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, बेळगाव जिल्हा हा राज्यातच सर्वात मोठा जिल्हा आहे.
त्यात 18 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. अर्थात उमेश कत्ती यांच्या निधनाने हे पद कोण भरणार याबाबत सर्वांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, भाजपला आपापल्या क्षेत्रात ताकद देऊ शकणारे नेते आपल्याकडे आहेत. ही पोकळी भरून पुढे जाण्याची जबाबदारी जिल्ह्यातील नेत्यांची आहे.
येत्या काही दिवसांत यावर चर्चा करून पक्ष बळकटीसाठी कार्यवाही केली जाईल. या पार्श्वभूमीवर अनेक कर्तबगार नेत्यांची नावे यावेळी ऐकायला मिळत आहेत. मात्र पक्षाच्या व्यासपीठावर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments