Belagavi

१८ रोजी उप्पार समाजाचा महामेळावा : विष्णू लातूर

Share

उप्पार समाजातील तरुणांना राजकारणात अधिक स्थान मिळावे तसेच महिलांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी बेळगाव येथील रेल्वे भवन येथे महामेळावा भरविण्यात येणार आहे अशी माहिती, उप्पार महासभा राज्याध्यक्ष विष्णू लातूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्यात ७० लाख उप्पार बांधव आहेत. आपल्या समाजाचा निवडणुकीपुरता वापर करण्यात येत आहे मात्र या समाजाला अधिकारात संधी देण्यात येत नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्याच्या राजकारणात केवळ ५ आमदार या समाजाशी निगडित आहेत. भाजप सरकारने समाजाला केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित स्थान दिले आहे. याव्यतिरिक्त कोणताही राजकीय दर्जा मिळाला नाही. उच्चस्तरीय अधिकारी लोकप्रतिनिधींना काम करू देत नाहीत. याविरोधात उप्पार समाजाने आवाज उठविण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी मांडले.

या पत्रकार परिषदेस मंजुनाथ राजपपानांवर, अरुण सवतिकाई, बालराज होळेप्पगोळ, शांता उप्पार, रेखा लक्कुंडी, लक्काप्पा करनिंगप्पगोळ आदींसह इतर समाजबांधव उपस्थित होते.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews