Belagavi

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १४ रोजी

Share

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून विधानसौधच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात हा समारंभ पार पडणार आहे, अशी माहिती कुलगुरू रामचंद्र गौड यांनी दिली.

सोमवारी बेळगाव शहरातील माहिती विभागात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. राणी चन्नम्मा विद्यापीठाशी बेळगाव, विजापूर आणि बागलकोट या जिल्ह्यातील ४१८ महाविद्यालये संलग्न आहेत.

सुमारे १.६४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून येत्या १४ सप्टेंबर रोजी दहावा दीक्षांत समारंभ आयोजित केला असल्याचे ते म्हणाले. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या समारंभात ४३६०७ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल थावरचंद गेहलोत हे असतील तर उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. याचप्रमाणे आंध्रप्रदेश येथील विजयनगर केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. टी व्ही कट्टीमनी यांचे भाषण होणार आहे.

या दीक्षांत समारंभात विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांचा मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये समाजसेवक रविचंदर, कन्नड सिनेसृष्टीतील रमेश अरविंद, दासोहच्या अन्नपूर्णाताई यांचा समावेश आहे.

Tags: