Athani

अथणीत हेस्कॉम कार्यालय आवारात कामगाराची आत्महत्या

Share

हेस्कॉम कार्यालयाच्या आवारात कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अथणी येथील हेस्कॉम कार्यालय आवारात घडली आहे.

होय, बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहर हेस्कॉम कार्यालयाच्या आवारात आज, सोमवारी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. ३० वर्षीय मंजुनाथ गंगाधर मुत्तगी या कर्मचाऱ्याने हेस्कॉम कार्यालयासमोर उभ्या केलेल्या जेसीबीच्या फाळक्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे हेस्कॉम कर्मचारी व ग्राहकांत खळबळ उडाली.

आत्महत्या केलेला मंजुनाथ कंत्राटी तत्वावर हेस्कॉममध्ये काम करत होता. मंजुनाथचा दोन वर्षांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट झाला होता अशी माहिती मिळाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासताच समजून येणार आहे.

हेस्कॉमच्या आणि अथणी स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात पाठवून देण्यात आला. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tags: