हॉटेलच्या प्रवेशद्वाराची काच फोडून चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना बेळगावात घडली आहे.
बेळगाव येथील वैभव नगर येथील ग्रँड हॉटेलमध्ये सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरी झाली.
हॉटेलच्या प्रवेशद्वाराची काच फोडून चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून सुमारे एक लाख रुपयांची रोकड चोरून पळ काढला. हे सर्व दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Recent Comments