भाजपच्या जनस्पंदन कार्यक्रमात लाखो रिकाम्या खुर्च्यांना भाजप नेत्यांनी संबोधित केले, असा टोला केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी लगावलाय.
विजापूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. भाजपच्या जनस्पंदन कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. तुमच्याकडे नसेल तर मला सांगा मी तो तुम्हाला पोहोचवेन असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सिद्धरामय्या यांच्याविरोधात सी टी रवी यांनी केलेले विधान मी पहिले नाही. जर त्यांनी अशापद्धतीने चुकीचे काही विधान केले असेल तर ते निषेधार्थ असल्याचे एम बी पाटील म्हणाले. सिद्धरामय्या हे ज्येष्ठ नेते आहेत. अशापद्धतीची विधाने जनता सहन करणार नाही त्यामुळे सी टी रवी यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांना एच डी कुमारस्वामी साथ देत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुमारस्वामी केव्हा आणि कुणाला कशापद्धतीने साथ देतील, हे सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले. म्हैसूरचे महापौर, मुस्लिम उमेदवार अशा अनेक प्रकारात त्यांनी साथ दिल्याचे एम बी पाटील म्हणाले. अशा गोष्टींमुळे राज्याची प्रतिमा पूर्णपणे खराब झाली असून जनता लवकरात लवकर हे सरकार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात चांगले सरकार आले पाहिजे, राज्याचे होणारे नुकसान नियंत्रणात आणले पाहिजे, यंत्रणा सुरळीत केली पाहिजे , राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. राज्याचे गतवैभव परत आणून भव्य आणि गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा प्रस्थापित करून ४० टक्के कमिशनवर चालणारे सरकार पाडले पाहिजे, असे मत एम बी पाटील यांनी व्यक्त केले.


Recent Comments