रायबागमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. या काळात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यात सीपीआय एच डी मुल्ला यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. यादरम्यान आज खुद्द गजराजांनी येऊन पोलीस ठाण्यात सीपीआयना आशीर्वाद दिले.

गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला. रायबागमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवात पोलिसांनी चौकाचौकात पहारा देत रात्रंदिवस कायदा आणि सुव्यवस्था उत्तमरीत्या हाताळली. दहा दिवसांपासून हा नित्यक्रम असलेल्या पोलिसांनी गणेशोत्सवानंतर पुन्हा पूर्ववत कामाला सुरुवात केली.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलीच मात्र याचप्रमाणे सीपीआय एच डी मुल्ला यांनीही मोलाची भूमिका बजावली. उत्सवकाळात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आधीच खबरदारी घेण्यात आली होती. रायबागमधील गणेशोत्सवात धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव न करता परिस्थिती उत्तमरीत्या हाताळल्या सीपीआयना खुद्द गजराजांनी पोलीस स्थानकात येऊन आशीर्वाद दिले आहेत.
उत्सवकाळात शांतता अबाधित राहावी, उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सीपीआय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. रायबागमध्ये गणेशोत्सवानंतर सात दिवस शताब्दी महोत्सव पार पडत आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या गजराजांनी सीपीआयना आशीर्वाद दिले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या सूचना आणि सहकार्याने गणेशोत्सव शांततेत पार पडला असून याकाळात गणेशोत्सव मंडळांचे सदस्य, नागरिक आणि हिंदू – मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वी झाल्याचे सीपीआय एच डी मुल्ला यांनी सांगितले. तसेच रात्रंदिवस नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
उत्सवकाळात जबाबदारीचे मोठे ओझे असणाऱ्या पोलीस दलाने रायबागमध्ये उत्साहात, शांततेत उत्सव साजरा करण्यासही मोठे परिश्रम घेतले असून पोलीस दलाच्या या कार्याचा गौरव खुद्द गजराजांनीच केल्याने परिसरात कौतुक होत आहे.


Recent Comments