Vijayapura

विजापूरमधील आदर्श मित्रांचा ग्रुप! ६ वर्षांपासून विजापूरमध्ये समाजसेवा

Share

मित्रमंडळी म्हटलं कि मौजमजा, गप्पाटप्पा आणि मनोरंजन हा नेहमीच ठरलेला विषय असतो. मात्र खूप कमी मित्रमंडळींचा गट असा असतो ज्या गटाच्या माध्यमातून अनेक समाजप्रबोधनपर किंवा समाजाप्रती काही उपक्रम करून जनतेची वाहवा मिळविली जाते. विजापूरमधील असाच एक मित्रमंडळींचा समूह गेल्या ६ वर्षांपासून निरंतरपणे समाजासाठी कार्य करत आहे…

विजापूर शहरातील आराध्यदैवत असलेले श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे मित्रमंडळींच्या गटातर्फे प्रत्येक सोमवारी प्रसादाचे वितरण केले जाते. दर सोमवारी प्रसादाचे वाटप करणाऱ्या या गटाचा आजचा सोमवार हा ३५० वा सोमवार आहे. गेली ६ वर्षे याठिकाणी प्रसादाचे वितरण केले जात आहे. विजापूर येथील उद्योजक प्रेमानंद हत्ती यांनी २०१८ पासून या सेवेला सुरुवात केली. केळी, सफरचंदचे वाटप प्रसाद म्हणून प्रत्येक सोमवारी या देवस्थानात केले जाते. ५०० हुन अधिक भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थिती मास्क, सॅनिटायझरचे वितरण देखील या समूहातर्फे करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून यानिमित्ताने अंध मुलांना स्वेटरचे वितरण करण्यात आले.

केवळ प्रसादाचेच वितरण नाहीतर कोविड काळात अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबांना, गरिबांना, स्वछता कर्मचाऱ्यांनाही या गटाने मदत केळी आहे. धान्यवितरण, कोविड लसीकरण, लसीकरणासंदर्भात जागृती असे अनेक उपक्रम या गटाने हाती घेतले आहेत. श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाण्याची खिचडी तसेच फळवाटप देखील करण्यात आले. या गटातर्फे हाती घेतलेल्या या उपक्रमांचे येथील जनतेतून कौतुक होत आहे.

मनोरंजन, गप्पाटप्पा, मजामस्ती या पलीकडे जाऊन मित्रमंडळींच्या या गटाने केलेले कार्य हे खरोखरच कौतुकास पात्र आहे.

विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews