Belagavi

सविता सुनिल पाटील यांना तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार

Share

कडोली येथील कचेरी गल्लीच्या रहिवाशी व गुंजेनट्टी येथील मराठी प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सविता सुनिल पाटील यांना २०२२ चा तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

खासबाग, बेळगाव येथील साईभवनात झालेल्या तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व बेळगाव ग्रामीण गट शिक्षणाधिकारी आर. पी. जुटण्णवर यांच्या हस्ते सविता पाटील याना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मूळच्या गर्लगुंजी (ता. खानापुर) येथील सविता भरमु पाटील यांनी १९९९ मध्ये निडगल (ता. खानापुर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी प्राथमिक शाळेतुन आपल्या शिक्षकी सेवेला प्रारंभ केला. २०१० पासून त्या गुंजेनट्टी (ता. बेळगाव) येथे सेवा बजावत आहेत.

त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रामाणिक व उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या निवृत्त सैनिक सुनिल पाटील यांच्या पत्नी होत.

Tags: