सोशल मीडियावर मुलांच्या अपहरणासंदर्भात टोळ्या सक्रिय असल्याच्या बातम्या वायरल होत आहेत. या बातम्या कितपत खऱ्या आहेत? याबाबत पोलीस विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कर्नाटक दलित संघर्ष समितीने बेळगाव पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
सोशल मीडियावर मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्यांच्या बातम्या वायरल होत आहेत. मुलांचे अपहरण करून त्यांचे अवयव काढले जात असल्याचे भयानक व्हिडीओ देखील वायरल होत आहेत. या बातम्यांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बातम्या कितपत खऱ्या आहेत? असा प्रश्न उपस्थित करत यासंदर्भात पोलीस विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आज पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्याकडे कर्नाटक दलित संघर्ष समितीने केली आहे.
यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समिती राज्य संचालक परशुराम नीलनायक, डॉ. कल्लाप्पा रामचंनावर, जिल्हा संघटना संचालक रवी बस्तवाडकर, सिद्राय मेत्री आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Comments