विश्वकर्मा जयंतीनिमित्त कर्नाटकातून महाराष्ट्रातील वेरूळला निघालेल्या विश्वकर्मा ज्योतीचे हुक्केरी तालुक्यातील यरनाळ गावात समाज बांधवांनी जोरदार स्वागत केले.

होय, येत्या 16 सप्टेंबर रोजी असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील शिरसंगी कालिकामाता मंदिरापासून विश्वकर्मा ज्योत काढण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळला ही ज्योत नेण्यात येत आहे. हुक्केरी तालुक्यातील यरनाळ गावात विश्वकर्मा समाजबांधवांतर्फे या ज्योतीचे पूजन करून भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी शिक्षक के. ए. बडिगेर यांनी भाषण करून विश्वकर्मा यांचा आदर्श आणि त्यांच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी प्रवीण बडिगेर, जयपाल बडिगेर, श्रीकांत बडिगेर व महिला व समाज बांधवांनी ज्योतीचे पूजन केले. त्यानंतर विश्वकर्मा ज्योत कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.


Recent Comments