निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरातील सदलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या महालक्ष्मी गुजरी दुकानात चोरट्यांनी सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

चोरट्यांनी रात्री प्रकाश गोसावी यांचे दुकान फोडून दुकानात लावलेला सीसी कॅमेरा तोडून लोखंडी व ऍल्युमिनियमच्या वस्तू,
वाहनाचे सुटे भाग असे अनेक मौल्यवान साहित्य आणि शेळीची तीन पिले चोरून नेली.
आज सकाळी मालक प्रकाश यांचा भाऊ दुकान उघडण्यासाठी आला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments