Belagavi

एनडीआरएफ निकषांच्या चारपटीने भरपाई द्यावी   राज्य रयत संघाच्या हसीरू सेनेची मागणी

Share

यंदाच्या अतिवृष्टीमुळे बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी या गावात गाजर आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून या पीक नुकसानीची योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

बैलहोंगल तालुक्यात घेण्यात येत असलेल्या गाजर आणि सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आज राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी होबळी व्याप्तीतील शेतजमिनीत गाजर आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांनी घ्यायचे ठरविले होते. मात्र अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात या पिकांचे नुकसान झाले असून हजारो एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ४० ते ५० हजार रुपये खर्चून उभ्या केलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, एनडीआरएफच्या निकषाच्या चौपट भरपाई द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी शेतकरी नेते मल्लिकार्जुन रामदुर्ग, शिवानंद मुगळीहाळ, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक, समर्थ पाटील, इराण्णा वककुंद, सुरेश पंगन्नावर, राजू मरवे, राजू दोड्डमनी, राजशेखर अंगडी, सुरेश अंगडी आदींसह इतर शेतकरी उपस्थित होते.

Tags: