आजकाल हजारो रुपये खर्चून चित्रपट अभिनेते–अभिनेत्रींची नावे–फोटो वाहनांवर लावून ती सजवली जातात, पण एका देशभक्ताने देशासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर, कित्तूर राणी चन्नम्मा यांचा उजवा हात क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा कांस्य पुतळा आपल्या ट्रॅक्टरवर उभारून आपले प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले आहे.

होय, देशभक्त संगोळ्ळी रायण्णा यांच्या चाहत्याने आपल्या हिंदुस्थान कंपनीच्या ट्रॅक्टरवर रायण्णा यांचा कांस्य पुतळा उभारून आपली निष्ठा, प्रेम दर्शवले आहे. तो कोण आहे आणि तो कोणत्या गावचा आहे याची माहिती आम्ही देतोय, ती एक…

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुडची येथील रहिवासी सिद्दलिंग अण्णाप्पा मेत्रे हे रायण्णाचे निस्सीम चाहते आहेत. त्यांनी आपल्या हिंदुस्थान कंपनीच्या 50HPच्या ट्रॅक्टरसमोर सुमारे 1 लाख रुपये खर्चून क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा ब्राँझचा पुतळा बसवलाय.
क्रांतीविरा संगोळ्ळी रायण्णा यांच्या या पुतळ्याची मुरगुंडी मुरसिद्धेश्वर मंदिराचे पुजारी विठ्ठल पुजारी यांनी पूजा केली. यावेळी जातीपातीचा विचार न करता सर्व धर्मीयांनी रायण्णा पुतळ्याचे पूजन केले. दूरदूरवरून आलेल्या रायण्णा चाहत्यांनी रायण्णा भव्य पुतळ्याची आरती करून पूजा केली. यावेळी ‘सोन्या कुडची’ नावाने ओळखला जाणारा शर्यतीचा घोडा लक्ष्यवेधी ठरला.
यावेळी बागप्पा शिद्दलिंग मेत्रे म्हणाले की, ‘सोन्या कुडची’ या घोड्याने जवळपास 25 वर्षांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये 100 हून अधिक प्रथम क्रमांकाची पारितोषिके जिंकली असून दोन्ही राज्यात एक मॉडेल बनला आहे.
यावेळी सिद्धलिंग मेत्रे यांच्यासह त्यांची मुले अण्णाप्पा मेत्रे, भागाप्पा मेत्रे, विठ्ठल मेत्रे, दुंडप्पा मेत्रे, मुरारी मेत्रे, शिवाजी मेत्रे, प्रकाश मेत्रे, धर्मन्ना मेत्रे, कलमेश्वरा तिगडी, सचिन तिगडी, विठ्ठल, उमेश धर्मट्टी, मल्लप्पा ओग्यागोळ, मरकप्पा ओग्यागोळ, ओगप्पा ओग्यागोळ, तसेच आणखी बरेच चाहते उपस्थित होते.


Recent Comments