हुक्केरी तालुक्यातील राजा लखम गौडा जलाशयातून रविवारी २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे घटप्रभा नदीच्या काठावरील नागरिकांनी गुरांसह सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन हुक्केरी तहसीलदार डॉ. दोड्डाप्पा हुगार यांनी केले आहे.


सध्या पावसाचा जबर अधिक असल्याने हिडकल जलाशयातील पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या प्रत्येक गावात आधीच खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नदीतीरावरील ग्रामस्थांनी जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन त्यांनी निवेदनातून केले आहे.


Recent Comments