Belagavi

डॉ. गिरीधर काजे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Share

सुप्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य डॉ. गिरीधर काजे यांच्याआयुर्वेद ज्ञान यान-16″ पुस्तक मालिकेतील सातवे पुस्तकसंस्कार रस वैविध्य गोड भोजनचे आज बेळगावात समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले.

व्हॉइस : आनंदवाडी-शहापूर येथील केएलई श्री बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात आज, रविवारी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री एस. सुरेश कुमार यांच्या हस्ते झाले. नंतर कन्नड साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष नाडोजा डॉ. महेश जोशी यांच्या हस्ते डॉ. गिरीधर काजे यांच्या आयुर्वेद ज्ञान यान-16 पुस्तक मालिकेतील सातवे पुस्तक ‘संस्कार रस वैविध्य गोड भोजन’चे प्रकाशन करण्यात आले. फ्लो

या प्रसंगी बोलताना लेखक डॉ. गिरीधर काजे म्हणाले की, हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन आयुर्वेदाची आज अनेक कारणांसाठी गरज आहे. 40 वर्षांपूर्वी माणूस कुणाच्याही मदतीशिवाय शंभर किलोची पिशवी सहज घेऊन जायचा. पण आता ते हळूहळू कमी होत आहे. माणसाची शारीरिक शक्ती पिढ्यानपिढ्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शारीरिक ताकद पुन्हा वाढवायची असेल तर आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट

यावेळी बोलताना सेल्को सोलरचे सीईओ मोहन भास्कर हेगडे म्हणाले की, डॉ. गिरीधर काजे हे आयुर्वेद क्षेत्रात गेली 25 वर्षे तपश्चर्या म्हणून कार्यरत आहेत. केवळ विज्ञानाने रोग बरा होतो असे नाही. आरोग्य आणि रोग हे शास्त्र आहे या कारणासाठी ते हे सर्व करत आहेत. आयुर्वेदाचा प्रभाव आणि त्याचे दूरगामी परिणाम समजून घेऊन लोकांच्या हितासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत, असे सांगत त्यांचे कौतुक केले. बाइट

केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे कुलसचिव प्रा. डॉ. व्ही. ए. कोठीवाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केएलई संस्थेच्या श्री श्री बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुहास शेट्टी, एसबीजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. अडिवेश अरकेरी, डॉ.रवी पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खोत पाटील अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवर व आयुर्वेदाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

#giridhar kaje book release