बेळगावात गणेशविसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीवेळी समाजसेवी युवकांनी गणेशभक्तांना आणि बंदोबस्तावरील पोलिसांना बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबवला.

होय, गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस, होमगार्ड्स तसेच मिरवणूक पहायला आलेली लहान मुले, महिला, वृद्धांना व अन्य नागरिकांना पिण्याचे पाणी आणि बिस्किट्स वाटप करण्याचा उपक्रम काही युवकांनी बेळगावात राबवला. यावेळी गणेश भक्तांना मोफत पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात युवा सामाजिक कार्यकर्ते ऍलन विजय मोरे, आर्यन अमर नलावडे, देव जैन, अद्वैत चव्हाण-पाटील, संदीप, कार्तिक, लकी सोळंकी, च्येरील मोरे, सागर शिर्के, सोनिया फ्रान्सिस, श्रीनिधी एच., हर्षल कदम, सिद्धार्थ, आदित्य, रितेश, सौरभ, शुभम सी., आणि उमंग आदी युवक-युवतींनी भाग घेतला.


Recent Comments