Belagavi

ग्रामीण भागातील केएलई संस्थेच्या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेत यश

Share

उत्तर कर्नाटकातील ग्रामीण भागातील केएलई संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे संचालक आणि माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली.

 

व्हॉइस : शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. सीईटी परीक्षा घेणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. रामकृष्ण हेगडे यांनी कर्नाटकातील मेडिकल, इंजिनियरिंग विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेची अंमलबजावणी केली. यामुळे भारतातील विद्यार्थी कर्नाटकाकडे वळू लागले यामुळे कर्नाटक राज्य भारतातील शैक्षणिक प्रदेश बनले आहे. २०१३ साली नीट परीक्षेला के एल इ संस्थेने अधिकमहत्व दिले हि बाब उत्तर कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरली, असे मत कवटगीमठ यांनी व्यक्त केले.

 

कवटगीमठ पुढे म्हणाले, केएलई संस्थेत ३६ पीयूसी विभागापैकी १७ अनुदानित आणि १९ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. बेळगाव, धारवाड, चिक्कोडी, निप्पाणी, गोकाक, रायबाग यासह विविध ठिकाणी स्वतंत्र महाविद्यालये स्थापन करून दर्जेदार शिक्षण दिले जाते.नीट परीक्षा हि केवळ वैद्यकीय प्रवेशासाठी नाही तर बीएचएम्स महाविद्यालयासाठीही उपयुक्त आहे. पालकांनी आता चिंता सोडावी आणि मुलांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करून शिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केएलई संस्थेच्या ६५ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत ४० हुन अधिक गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली असून डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी डॉ. जलापूरे, सतीश एम पी, प्रो. संजाप्पा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags:

#kle mahantesh kavatagimath