Chikkodi

चिकोडी शहरात हनगल कुमार महास्वामी जयंतीचे आयोजन

Share

हनगल श्री कुमार महास्वामी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त चिकोडी शहरात ११ ते २१ सप्टेंबर या दरम्यान भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरपालिकेचे सदस्य जगदीश कवटगीमठ यांनी दिली.

व्हॉइस : चिकोडी चरमूर्तीमठ येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. सर्वधर्मसमभाव या भावनेतून हा सोहळा होणार असून शहरातील शहरातील सीएलई संस्थेच्या प्रांगणात ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमास निडसोशी पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी, चिंचणी श्री अल्लमप्रभू स्वामीजी, सम्पाद स्वामीजी आदींची प्रमुख उपस्थिती असेल. आडी-हंदीगुंद सिद्धेश्वर विरक्तमठाचे शिवानंद स्वामी यांचे प्रवचन देखील होणार आहे. १२ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कार्यकाळात ५० स्वामी चिकोडी तालुक्यातील प्रत्येक गावात पदयात्रा करणार असून धार्मिक चिंतनासह धार्मिक वारसा जपण्यासाठी विभूती आणि रुद्राक्ष देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत शहरातील भीमनगर, मातंगीकेरी, आंबेडकर नगर येथून पदयात्रा सुरू होईल.

 

१२ तारखेला चिक्कोडी तालुक्यातील करोशी, मुगळी, कमत्यानहट्टी गावात सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत चिक्कोडी व तालुक्यातील विविध गावातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

चिंचणी श्री अल्लमप्रभू स्वामी बोलताना म्हणाले, हनगल श्री कुमार महाशिवयोगी हे या शतकातील युगपुरुष आहेत, वीरशैव लिंगायत वारशाची अभिव्यक्ती आहेत. आत्मसमर्पण संस्कृतीच्या आधारे अज्ञानाच्या अंधारामुळे निद्रावस्थेतील सर्वसमावेशक समाज त्यांनी पुन्हा अस्तित्वात आणला. हे महान कार्य करणाऱ्या हनगल कुमार महाशिवयोगी यांची १५५ वी जयंती धार्मिक वारशाची जाणीव करून देण्यासाठी धार्मिक प्रबोधनासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या पत्रकार परिषदेला संपादन स्वामीजी, कमत्यान्हत्ती गुरुदेव, नगरपालिका अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, व्याख्याते संजय कवटगीमठ, सुरेश उक्केरी आदी उपस्थित होते.

Tags:

#hangalkumarsmahaswami