Belagavi

बेळगावात ब्रह्मश्री नारायण गुरूंची 168 वी जयंती

Share

सध्याच्या सामाजिक परिस्थितीत मठाधिशांनी ऐतिहासिक गुरू ब्रह्मश्री नारायण यांची तत्त्वे आणि आदर्श आत्मसात केले पाहिजेत असे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या शास्त्रीय कन्नड भाषा अभ्यास संस्थेचे सहायक प्राध्यापक गजानन नायक यांनी मांडले.

 

व्हॉइस : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती खाते आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातील कुमार गंधर्व रंगमदिर येथे ब्रह्मश्री नारायण गुरूंच्या 168 व्या जयंती कार्यक्रमाला संबोधित करताना प्रा. गजानन नायक म्हणाले, उत्तर भारतातील रामकृष्ण परमहंस, दक्षिण भारतातील ब्रह्मश्री नारायण गुरु यांनी समान समाजासाठी कार्य केले आणि लोकांना जागरुक केले. अध्यात्मिक विचारवंत नारायण गुरूंच्या सामाजिक समानतेचे विचार श्रेष्ठ आहेत. त्यांनी जाती, धर्म, पंथ झुगारून शिक्षण, समाज आणि मानवता हेच श्रेष्ठ आहे, या उदात्त विचारापोटी श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी बलिदान दिले असे त्यांनी सांगितले.

 

उद्योगपती सुधीर सालियान, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags:

#belgaum brahmshri narayan guruji