Belagavi

जीआयटीत “तंत्रज्ञ-टेक्निकल टेक्नोव्हेशन प्रोजेक्ट एक्स्पो”

Share

बेळगावातील केएलएस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आजतंत्रज्ञटेक्निकल टेक्नोव्हेशन प्रोजेक्ट एक्स्पोकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सर एम. विश्वेश्वरय्या सभागृहात आज गुरुवारी बीई प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “तंत्रज्ञ-टेक्निकल टेक्नोव्हेशन प्रोजेक्ट एक्स्पो” प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे 96 प्रकल्प तयार करून प्रदर्शनात ठेवले. यावेळी सोलर पॅनल पर्यायी सर्किट प्रकल्प बनवणाऱ्या निव्यात सिंग या विद्यार्थ्याने त्याच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली.

या नंतर मेकॅनिकल विभागाचे प्रा. डॉ. महेश कोरी यांनी आमच्या इनन्यूज-आपि मराठीशी संवाद साधला.  विद्यार्थ्यांमधील सुप्त प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जैवविविधता आणि उद्योगांसाठी उपयुक्त यंत्रे बनवून विध्यार्थ्यानी या प्रदर्शनात मंडळी आहेत. या माध्यमातून त्यांनी आपली अप्रतिम प्रतिभा समोर आणली आहे. भविष्यात अधिकाधिक यश मिळवण्यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे प्रोत्साहन देईल, असे ते म्हणाले.

 

या एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांनी एकूण 96 प्रकल्पांचे प्रदर्शन केले असल्याचे संगणकशास्त्र विभागाचे डॉ.संजय यांनी सांगितले. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त अशा यंत्रांवर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांनी सहा महिन्यांहून अधिक काळ सतत काम करून प्राध्यापकांचा सल्ला घेऊन विविध प्रकारचे प्रकल्प तयार केले. बीईच्या पहिल्या वर्षात हे यश संपादन केलेले आमचे विद्यार्थी आगामी काळात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

एकंदरीत, चांगले व्यासपीठ मिळाल्यास आपण काहीही साध्य करू शकतो हे बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. भविष्यात त्यांनी आणखी यश साध्य करावे हीच प्रत्येकाची इच्छा आहे.

Tags:

#git belgaum