Belagavi

उमेश कत्ती यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी हानी : डॉ. के. सुधाकर

Share

उमेश कत्ती यांच्या निधनामुळे राज्यासह आपले वैयक्तिक नुकसान झाले असून उमेश कत्ती यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, असे मत आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी व्यक्त केले.

 

बेळगावमधील सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. उमेश कत्ती यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आपल्याला दूरध्वनीवरून माहिती मिळाली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

नशिबापुढे त्यांची तब्येत टिकू शकली नाही. हिडकल डॅममध्ये के आर एस धर्तीवर विकास करण्याची उमेश कत्ती यांची आशा होती, हि बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Tags:

#dr k sudhakar umeshkatti