उमेश कत्ती हे एक बिनधास्त व्यक्ति होते. त्यांच्या निधनामुळे भाजपचे आणि राजचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात भाजप राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली.
गुरुवारी सांबरा विमानतळावर आलेल्या अरुण सिंग यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. अरुण कत्ती हे आपले स्नेहीत होते. आम्ही जेव्हा बेंगळुरू, दिल्ली आणि बेळगावमध्ये भेटायचो त्यावेळी बराच वेळ चर्चा करायचो.
पक्ष संघटनेबद्दल चर्चा करायचो. उमेश कत्ती हे मैत्रीपूर्ण असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे राज्याचे आणि भाजपचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
बुधवारी विमानसेवा उपलब्ध नसल्याने येणे शक्य झाले नाही, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली.


Recent Comments