Belagavi

शिवसेनेच्या सुंदर गणेशमूर्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण

Share

बेळगाव जिल्हा शिवसेनासीमाभाग यांच्या वतीने यंदाही सुंदर सार्वजनिक गणेश मूर्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्तर विभागात कपिलेश्वर चौक गणेश मंडळाच्या तर दक्षिण विभागातून राजहंस गल्ली, अनगोळच्या मंडळाच्या श्री मूर्तीने प्रथम क्रमांक पटकावला.

बेळगाव जिल्हा शिवसेना-सीमाभाग यांच्या वतीने दरवर्षी सुंदर सार्वजनिक गणेश मूर्ती स्पर्धा घेण्यात येतात. यंदाही बेळगावातील उत्तर आणि दक्षिण विभागासाठी स्वतंत्र सुंदर श्रीमृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्तर विभागात कपिलेश्वर चौक गणेश मंडळाच्या श्री मूर्तीने प्रथम क्रमांक मिळवला. कंग्राळ गल्ली मंडळाच्या मूर्तीने द्वितीय, सम्राट अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली मंडळाच्या मूर्तीला तृतीय, पं. मदन मोहन मालवीय चौक, शनिवार खूट-खंजरी गल्ली मंडळाच्या मूर्तीला चौथा तर कडोलकर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला पाचवा क्रमांक मिळाला.

 

दक्षिण विभागातून राजहंस गल्ली, अनगोळच्या मंडळाच्या श्री मूर्तीने प्रथम क्रमांक पटकावला. वझे गल्ली, वडगाव या मंडळाच्या मूर्तीला द्वितीय, कारभार गल्ली, वडगाव या मंडळाच्या मूर्तीला तृतीय, संभाजी रोड, पाटील गल्ली, खासबाग या मंडळाच्या मूर्तीला चौथा तर सराफ कट्टा, खडेबाजार, शहापूर या मंडळाच्या श्रीमूर्तीला पाचवा क्रमांक मिळाला.

 

आज, मंगळवारी उत्तर विभागाचा बक्षीस समारंभ श्री गणेशोत्सव मंडळ, कपिलेश्वर चौक येथे तर दक्षिण विभागाचा बक्षीस वितरण समारंभ राजहंस गल्ली, अनगोळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात पार पडला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांच्याहस्ते विजेत्या मंडळांना मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख महेश टंकसाळी, विभागप्रमुख राजू कणेरी, प्रकाश हेब्बाजी, निरंजन अष्टेकर, प्रदीप सुतार, विजय मुरकुटे, बाळासाहेब डंगरले, मयुरेश काकतकर, लक्ष्मण चतुर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

#belgaumshivsena ganeshmurthi competitation