Belagavi

आजपासून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा : मुख्यमंत्री

Share

अन्न व नागरी पुरवठा तसेच वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे आजपासून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

व्हॉइस : बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाल्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, आमचे एक जिवलग मित्र, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी, राज्यातील एक दिग्गज नेता आम्हाला सोडून गेला आहे. अत्यंत जड अंतःकरणाने आज बेळगावला आलो आहे. उमेश कत्ती यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. आज मी जास्त बोलणार नाही. मी काल सर्व गोष्टींबद्दल बोललो. अंत्यसंस्कारासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हिरा साखर कारखाना परिसरात जनतेला अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही घरी पूजा आणि त्याच्या शेतात अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था केली आहे. लोक मोठ्या संख्येने येत असल्याने आम्ही सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.

उमेश कत्ती यांचे अंत्यसंस्कार राज्य सरकारी इतमामात सन्मानाने करण्याचे आदेश आम्ही यापूर्वीच जारी केले आहेत. तसेच आज राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात आणीबाणीची पूर व्यवस्थापनाची सर्व कार्ये सुरू राहतील. त्याशिवाय इतर कोणतेही उपक्रम होणार नाहीत. सर्व सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे. दोड्डबळ्ळापूर येथे उद्या होणारा जनोत्सव कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून तो 11 सप्टेंबर रोजी दोड्डबळ्ळापूर येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदर, राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या उमेश कत्ती यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: