Belagavi

अलारवाडला मुस्लिम स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांची निदर्शने

Share

बेळगाव तालुक्यातील अलारवाड गावातील मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडले. तातडीने जागा उपलब्ध करून दिल्यास यापुढे मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून निषेध नोंदवण्याचा इशारा त्यांनी दिला.

अलारवाड गावातील मुस्लिम समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नाही. आतापर्यंत एका खासगी जागेत अंत्यविधी करण्यात येत. मात्र त्या जागा मालकाने आता अंत्यविधी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हजरत बिलाल मशीद एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी, जमात चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य व ग्रामस्थांनी आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी अलारवाड गावातील मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अलारवाड गाव बेळगाव महापालिका हद्दीत येते. येथे मुस्लिम समाजाची सुमारे 120 घरे आहेत. आम्ही R.S.No.280/1,2 आणि 281 या जमिनीत 300 वर्षांपासून येथे अंत्यसंस्कार करत आहोत. तसेच गावातील पंचांनीही स्मशानभूमीसाठी जमीन देण्याचे मान्य केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. फ्लो

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जमात कमिटीचे मुतवल्ली शरीफ मुल्ला म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही स्मशानभूमीच्या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. शासनाकडून 18 गुंठे जमिनीचा मोबदला द्यावा आणि मुस्लिम समाजाला स्मशानभूमीची जागा द्यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाला करण्यात आली असली तरी त्यांना स्मशानभूमीची जागा देण्यात आली नाही. अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याकडे अनेकवेळा निवेदने, अर्ज दिले आहेत. त्यांनी तहसीलदारांकडे जायला सांगितले. अधिकारी आमची केवळ पळवापळव करत आहेत. आता जर मुस्लिम समाजाला स्मशानभूमी न दिल्यास मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात ठेऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. बाईट

यावेळी शरीफ मुल्ला, रफीक दावलसाब, रहेमान तटगार, सय्यद मुल्ला, बी. एस. रोटीवाले आदी उपस्थित होते.

Tags:

#muslim