Belagavi

ऍड. डॉ. एस. बी. शेख यांना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट

Share

बेळगावातील प्रसिद्ध विधितज्ज्ञ डॉ. एस. बी. शेख यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

 

डॉ. एस. बी. शेख हे गेल्या 36 वर्षांपासून बेळगावात तसेच कर्नाटक हायकोर्टात वकिली करत आहेत. विविध कायद्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातून त्यांनी कायदा अभ्यासक्रम परीक्षेत सुवर्ण पदक मिळवले आहे. आजवर विविध कायद्यांची 16 पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. आजवर त्यांना 3 डॉक्टरेट मिळाल्या असून ही त्यांची चौथी डॉक्टरेट आहे. अनेक विधी महाविद्यालयात ते अतिथी प्राध्यापक म्हणून काम पाहतात. कायदा क्षेत्राला दिलेल्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे हॉटेल लीला येथे 3 सप्टेंबरला झालेल्या समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू व अन्य वरिष्ठ उपस्थित होते.

Tags: