देश घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असे मत माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी व्यक्त केले. हुक्केरी येथे शिक्षण दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.हुक्केरी येथील विश्वराज कल्याण मंडप येथे हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामी यांच्याहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


हिरा शुगर्सचे संचालक आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांच्याहस्ते दीपप्रज्वलन पार पडलं.ए या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, इओ उमेश सिदनाळ, नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील, शासकीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष अविनाश हुल्लेप्पगोळ, कृषी अधिकारी महादेव पटगुंदि, हिरा शुगरचे संचालक अशोक पाटील, अक्षर दासोहाच्या संचालिका सविता हलकी, बीएआरसी ए एस पद्मन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते. बीईओ मोहन दंडीन यांनी प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी हुक्केरी तालुक्यातील उत्कृष्ट सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, देश घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, कोणत्याही क्षेत्रात चुका झाल्या तरी त्या सुधारता येतात, मात्र शैक्षणिक क्षेत्रातील चुका देशासाठी घातक ठरू शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी हुक्केरी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शासकीय व खाजगी अनुदानित शाळांचे शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments