Belagavi

हत्तरगीत धारदार हत्याराने वार करून तरुणाचा निर्घृण खून

Share

 

हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी गावात रात्री उशिरा एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली.

 

28 वर्षीय विनायक असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो यमकनमर्डी येथील रहिवासी आहे. विनायक दुचाकीवरून आपल्या गावी यमकनमर्डीला जात असताना पाठीमागून आलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केला. त्यामुळे तो कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने विनायकचा जागीच मृत्यू झाला. शनिवारीच त्यांनी वाढदिवस साजरा केल्याचे सांगण्यात येत आहे. यमकनमर्डीचे पीएसआय बी. व्ही. नामगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

 

गेल्या वर्षी या तरुणाने सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर फरार झालेल्या विनायकला पोलिसांनी अटक केली होती. काही महिन्यांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती. या दरम्यान त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Tags:

#hukkeri yamakanmardi #youth murder