खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते चिक्कोडी येथील सार्वजनिक रुग्णालय परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला चालना देण्यात आली.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आज खासदार स्थानिक क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत चिक्कोडी शहरातील सार्वजनिक रुग्णालयाच्या आवारात सुमारे 10 लाख रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक, आरआरसी गटर बांधण्याच्या कामाला चालना दिली. कार्यक्रमाला संबोधित करताना खासदार जोल्ले म्हणाले, चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयासमोर रुग्ण व डॉक्टरांनी पेव्हर ब्लॉक बसविण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज आम्ही पेव्हर बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मी एक रुग्णवाहिका दिली आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात एकूण 10 रुग्णवाहिका दिल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

तेव्हा ज्येष्ठ नगरसेवक जगदीश कवटगीमठ म्हणाले की, खासदार जोल्ले यांनी आज सार्वजनिक रुग्णालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू केले आहे, ही चिक्कोडी शहरासाठी अभिमानाची बाब असून कोरोना संदर्भात रुग्णांची काळजी घेण्याचे चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयाने चांगले काम केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवठगीमठ, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, वैद्यकीय अधिकारी संतोष कोन्नूर, डॉ. लक्ष्मीकांत कडलेप्पागोळ, विश्वनाथ कामगौडा, सिद्धप्पा धंगेरा, डॉ. सचिन बकरे, वर्धमान बदनिकायी, डॉ. कावेरी चराटे, डॉ. ज्योती चितळे, जगदीश हुलाकुंद, रूपा अगसिमणी आदी उपस्थित होते.


Recent Comments