Belagavi

मुतगा येथे राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी पुतळ्याची मिरवणूक

Share

बेळगाव तालुक्यातील मुतगा येथे बाल शिवाजी युवक मंडळाच्या वतीने, राजमाता जिजाऊ बाल शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले. मुतगा गावातील माता, भगिनीं, तरुण, वडील मंडळी सर्व ग्रामस्थ स्वाभिमानी असून शिवरायांच्या विचारांनी प्रेरित आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या कार्यात उत्साहाने सहभागी होत असतात. आपण सर्वजण मिळून राष्ट्र निर्माणाचे कार्य करूया असे ते म्हणाले.

 

या प्रसंगी भाजप नेते उमेश पुरी म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश स्वातंत्र झाल्यापासून 75 वर्षानंतर देशाच्या नौदलाचा ध्वज बदलून शिवरायांना समर्पित नवीन ध्वज देऊन गुलामगिरीचे निशाण मिटविले. हा मराठा समाजाचा गौरव आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला गावातील हजारो हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते.

Tags:

#belgaumganeshotsav #chatrapatishivajimaharaj #rajamatajijau