श्री गणेशोत्सवानिमित्त स्थापन केल्या जाणाऱ्या ज्येष्ठा गौरीचे पूजन आज बेळगावमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. महिलावर्गाचा उत्साह आणि पारंपरिक पूजनाने आज गौरी आवाहनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
बेळगाव शहरात श्री गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर स्थापन केल्या जाणाऱ्या गौरी आवाहनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ठिकठिकाणी असलेल्या पाणवठ्यावर महिलावर्गाने गौरी भरून वाजतगाजत गौरीचे स्वागत केले. विविध प्रांतानुसार विविध पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या प्रथेत सौभाग्यासाठी महिला गौराईकडे प्रार्थना करतात.

श्री गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी गौरी किंवा ज्येष्ठा गौरींची स्थापना केली जाते. अनेक भागात गंगा – गौरी च्या स्वरूपात उभ्या गौरी पूजवल्या जातात. पंचपक्वान्न आणि विशेष नैवेद्य दाखवून गौरी पूजनाचा सोहळा पार पडतो. यासंदर्भात बेळगावमधील गौरीपूजन करणाऱ्या महिलांनी सांगितले, कि गेल्या १५ वर्षांपासून आपण गौरी आवाहन आणि पूजनाचा सोहळा करत असून गौरी आवाहनाचा दुसरे दिवशी वैशिष्ट्यपूर्ण नैवेद्य दाखवून त्यानंतर मूळ नक्षत्रावर गौरी गणपती विसर्जन करण्यात येते.
गौरी आवाहनही तयारी करण्यासाठी लहान मुली पारंपरिक वेशात देवस्थान, पाणवठ्याच्या परिसरात दिसून आल्या. मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार थाटामाटात आज गौराईचे आगमन घरोघरी करण्यात आले आहे.


Recent Comments