Belagavi

मुसळधार पावसामुळे प्रभाग क्र. १३ मध्ये पाणीच पाणी!

Share

गेल्या पाच सहा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव महानगर पालिकेच्या व्याप्तीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये घराघरात पाणी शिरले आहे. या समस्येवर कायसमवरूपी तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

व्हॉइस : बेळगाव महानगर पालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १३ मधील वीरभद्र नगर, शिवाजी नगर आणि आसपासच्या परिसरात पावसामुळे मोठे नुकसान होते. पावसामुळे येथील घराघरात पाणी शिरण्याची समस्या नेहमीच याठिकाणी उद्भवत असते. यामुळे जनतेच्या आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होत असून गेल्या ३ वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना विनवण्या करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. या परिसरातील सदर समस्या तातडीने सोडविण्यात यावी, यासाठी आज येथील स्थानिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले.

या समस्येसंदर्भात अधिक माहिती देताना येथील स्थानिक रहिवासी म्हणाले, गेल्या ३ वर्षांपासून अशीच समस्या उद्भवत आहे. पाऊस झाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि घराघरात पाणी शिरते. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे तब्येतीवर परिणाम होत असून पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिल्यानंतर केवळ सर्वेक्षण करण्यात येते मात्र समस्या कधीच सोडविण्यात येत नाही. या भागात नेहमीच्या झालेल्या या समस्येमुळे येथे वावरणे कठीण झाले आहे. आपल्या भागात होत असलेली अव्यवस्था तातडीने दूर करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

या प्रभागाच्या नगरसेविका बोलताना म्हणाल्या, या भागात असलेल्या नाल्याचे काम योग्यपद्धतीने न झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यामुळेच पाणी घराघरात शिरून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना सांगूनही कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. यामुळे आज पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येत असून या भागात पाऊस पडल्यानंतर सुमारे २५ हजार लोकांना त्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये निर्माण झालेल्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात यावा, या मागणीसाठी येथील स्थानिकांनी पालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

Tags: