Belagavi

केंद्रातील भाजप सरकार चंबळ डाकूंपेक्षाही भयानक : रमेश कुडची

Share

केंद्रातील भाजप सरकार हे चंबळ खोऱ्यातील डाकूंपेक्षाही भयानक असून जीएसटीच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रमेश कुडची यांनी केला.

बेळगावमधील प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी हि प्रतिक्रिया दिली असून देशातील जनता जीएसटीमध्ये भरडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारनेही जीएसटी लावला मात्र त्यावेळी मर्यादेत जीएसटी लावण्यात आला होता. यावेळी भाजपने जीएसटीला विरोध केला. सत्तेत आल्यानंतर सामान्य नागरिकांचा विसर सरकारला पडला असून सामान्य नागरिकांना कोणत्या देशात घेऊन जाण्यात येत आहे, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शिवाय प्रत्येक गोष्टीसाठी आता कर भरावा लागत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. दोन महिन्यांपूर्वी एक कायदा पास करण्यात आला. यात बँकेतून काढण्यात आलेल्या पैशावरदेखील सरकारने डोळा ठेवला असून हा प्रकार चंबळ खोऱ्यातील डाकूंपेक्षाही भयानक असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्याच पैशावर आम्हीच दंड भरायचा हा कोणता न्याय आहे? असा सवाल उपस्थित करत सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकार दुहेरी जीएसटी वसूल करत असल्याचं सांगत रमेश कुडची यांनी भाजपवर सडकून टीका केली.

यापूर्वी व्यापाऱ्यांनी १० तारखेपर्यंत जीएसटी न भरल्यास २०० रुपये दंड आकारला जात होता. आता हाच दंड ५० रुपये इतका आकारण्यात येत आहे. मोठमोठ्या श्रीमंतांना १० लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. सर्वसामान्य जनतेचा पैसा घेऊन श्रीमंतांची कर्जे माफ करण्यात येत असल्याचा आरोपही रमेश कुडची यांनी केला. ()

जीएसटीमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असल्याचे सांगत माजी आमदार रमेश कुडची यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews