Belagavi

संगोळी रायन्ना यांच्या जीवनावर आधारित संगीत नाटक

Share

बेळगावमधील संगोळी रायन्ना प्रथम श्रेणी घटक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कन्नड केसरी संगोळी रायन्ना या ऐतिहासिक संगीत नाट्याचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली आहे.

राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, संगोळी रायन्ना अभ्यास केंद्र आणि संगोळी रायन्ना प्रथम श्रेणी घटक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क ग विजापूर रचित आणि डॉ. एच बी कोलकार संपादित कन्नड केसरी संगोळी रायन्ना या ऐतिहासिक संगीत नाटकाचे सादरीकरण केले. शुक्रवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात या संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. एम रामचंद्रगौडा यांच्याहस्ते संगीत नाटकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एमएलसी एच एम रेवांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

संगोळी रायन्ना यांच्या जीवनावर आधारित संगीत नाट्याचे सादरीकरण करण्यासाठी तीन वर्षांची मेहनत घ्यावी लागली. या नाटकासाठी २ कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला असून संगोळी रायन्ना यांचे बलिदान, धैर्य, शौर्य आणि साहस आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश या नाटक सादरीकरणामागे आहे. संगोळी रायन्ना हे कोणत्याही विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशाची संपत्ती आहेत. त्यांच्या बलिदानाची, शौर्याची माहिती आजच्या तरुणपिढीला प्रेरणादायक ठरावी या उद्देशाने या नाटकाचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रो. एम. रामचंद्रगौडा यांनी दिली. ()याचप्रमाणे आरपीडी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. बी. कोलकार यांनीही या नाटकासंदर्भात प्रतिक्रिया दिली. आजच्या काळात देशभक्ती केवळ व्यासपीठावरील भाषणांपुरती मर्यादित आहे. यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना देशभक्तीची नितांत गरज असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्याचे काम केले पाहिजे, अशा लढवय्यांचे बलिदान आजच्या तरुणांच्या हृदयात वसले पाहिजे यासाठी या नाटकाची तयारी करण्यात आली असून या नाटकात कोलकार पथकात २९ कलाकार सहभागी असल्याचे ते म्हणाले. परीक्षेचे दडपण असूनही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, या नाटकासाठी अनेकांचे सहकार्य लाभले या साऱ्यांचे त्यांनी आभार मानले. ()

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक का. ता. चिक्कण्णा, संगोळी रायन्ना विकास प्राधिकारचे आयुक्त मल्लेशाप्पा, आरसीयु सिंडिकेट सदस्य डॉ. आनंद होसूर, कर्नाटक उच्च शिक्षण परिषदेचे विशेष अधिकारी डॉ. एम जयाप्पा, आरसीयु कुलगुरू प्रो. एम. हणमंतप्पा, मूल्यमापन कुलगुरू प्रो. शिवानंद गोरनाळे, वित्त अधिकारी डी. एन. पाटील, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, प्राचार्या डॉ. एस एस तेरदाळ आदींसह अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कलाकार उपस्थित होते .

Tags: