बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावात क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत शाळकरी मुलांसाठी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य खाते, बैलहोंगल तालुका पंचायत, अनिगोळ ग्रामपंचायत आणि कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात आरोग्य अमृत अभियानाचे तालुका समन्वयक संजू पट्टीहाळ यांनी शालेय मुलांना क्षयरोग आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा कराव्यात तसेच किचन गार्डनबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.



Recent Comments