काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवार संबंधित मतदार संघात लोकप्रिय आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा असणे आवश्यक असून इच्छुकांनी चांगली कामही करणे अपेक्षित आहे. सर्व पक्षांचे उमेदवार ठरल्यानंतर अंतिम सर्वेक्षण करून आपला उमेदवार निश्चित करण्यात येईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.

सतीश जारकीहोळी यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी जारकीहोळी समर्थकांनी केली असून यासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, सर्व मतदार संघात पुरेसे उमेदवार आहेत, दोन्ही बाजूंनी निवडणूक लढविण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यमकनमर्डी सोडून इतर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा विचार आहे? या प्रश्नावर उत्तर देतें जारकीहोळी म्हणाले, आपण सौंदत्ती येथून निवडणूक लढवेन, याचे कारण म्हणजे याठिकाणी पक्ष संघटित आहे. आणि केवळ सौंदत्तीच नाही गोकाक, अथणी येथेही विजयी होण्यासाठी पक्ष संघटित होत असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यात १० ते १२ जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करून असून कमीतकमी १० आणि जास्तीत जास्त १२ जागांचे आपले लक्ष्य आहे. या भागातील उमेदवार निवडताना उमेदवाराची संबंधित मतदार संघातील लोकप्रियता पाहून उमेदवारी देण्यात येणार आहे. शिवाय सदर इच्छुक उमेदवार हा त्या भागातील आकर्षक व्यक्तिमत्व असणे गरजेचे आहे, यासारख्या इतर निकषांवर उमेदवार निवडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सर्व मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. एकीकडे सहा, दुसरीकडे २, तर काही ठिकाणी १ असे उमेदवार असून अनेक उमेदवारांची शिफारसही करण्यात आली आहे. सर्व्हेनंतर कुणाचे नाव येईल, त्यांना उमेदवारी देण्यात येईल. यापूर्वीच एक सर्वेक्षण झाले असून सर्व पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच काँग्रेस उमेदवार जाहीर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२३ सालच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच राजकारण्यांनी सुरु केली असून बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस १० ते १२ जागांवर विजयी होईल, असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय.


Recent Comments