चिकोडी तालुक्यातील येडूर बॅरेज ते सैनिक टाकळी पर्यंतच्या रस्त्याच्या विकासकामाला आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते चालना देण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ३ कोटी रुपयांच्या निधीतून ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विकासकाम हाती घेण्यात आले असून सदर कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार हुक्केरी म्हणाले, येडूर बॅरेज ते सैनिक टाकळी रस्त्याच्या दुरवस्था झाली होती. यामुळे येथील नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. या रस्त्याच्या विकासाची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली होती. या मागणीनुसार विकासकाम हाती घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
यानंतर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील यांनी आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून सुरु केलेल्या रस्त्याच्या विकासकामाबद्दल आमदारांचे आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष राहुल देसाई, महेश कागवाडे, शिवानंद करोशी, संजय पाटील, तेजगौड पाटील, भीमगौडा पाटील, पांडुरंग कोळी, जयपाल बोरगाव, रवींद्र बोरगावे, दादू कागवाडे, शशिकांत पाटील, विजय जाधव, पोपट किल्लेदार, महेश बेळवी, गजू कमते, यासिन नदाफ, कंत्राटदार रवी माळी आदी उपस्थित होते.


Recent Comments